twelve covid samples negative from jamkhed 
twelve covid samples negative from jamkhed  
नगर

जामखेडमधील 14 पैकी 12 जण निगेटिव्ह : तहसिलदार

सरकारनामा ब्युरो

जामखेड (नगर) : जामखेडमधील काझी मशिदीत आढळून आलेल्या 14 व्यक्तींपैकी काल दोघांचे स्त्राव नमुने पॉझिटिव्ह आले होते, तर तिघांचे निगेटिव्ह आले होते. उर्वरित नऊ व्यक्तींचे अहवाल आज मिळाले असून, ते निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.

काझी मशिदीत परदेशातील दहा आणि भारतातील चार असे मिळून 14 जण सार्वजनिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले होते. ही बाब पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नगरला पाठवले होते. यापैकी पाच व्यक्तींचे रविवारी (ता. 29) तपासणीचे अहवाल प्राप्त झाले होते. या पैकी दोघेजण कोरोनाबाधित, तर तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरित नऊ जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आज संपली.

दरम्यान, या 14 जणांच्या संपर्कात आलेल्या जामखेडमधील स्थानिक लोकांमध्ये भितीचे वातावरण अद्याप कायम आहे. प्रशासनाने अशा 31 जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याने त्यांचीही तपासणी होणार आहे. त्यामुळे त्या लोकांकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT